Awesome Fixed Call-To-Action Section!

Visit our shop
84 Emerson Road
Opening Hours
Mon-Fri: 10am-5pm
Book an appointment
+00 123 123 123

Awesome Fixed Call-To-Action Section!
Awesome Fixed Call-To-Action Section!
Error: Contact form not found.
१. यकृतामध्ये हानिकारक पेशींची वाढ आणि प्रसार याला यकृताचा कर्करोग म्हणतात.
जो कर्करोग यकृतामध्ये सुरु होतो त्याला यकृताचा प्राथमिक कर्करोग. जो कर्करोग दुसऱ्या अवयवातून यकृतामध्ये पसरला आहे त्याला मेटास्टॅटिक यकृत कर्करोग म्हणतात.
२. प्राथमिक यकृत कर्करोगाचे रिस्क फॅक्टर्स :
प्राथमिक यकृताचा कर्करोग दरवर्षी भारतात सुमारे 30,000 ते 50,000 लोकांना प्रभावित करतो. भारतात वाढत असलेल्या काही दुर्धर आजारांपैकी हा एक आहे आणि तो स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांना दुपटीने प्रभावित करतो. सिरोसिस, क्रॉनिक हिपॅटायटीस बी, क्रॉनिक हेपेटायटीस सी आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग हे काही दुय्यम रिस्क फॅक्टर्स आहेत.
३. अनेकदा यकृताच्या कर्करोगाची लक्षणे दिसून येत नाहीत:
यामध्ये थकवा, सूज येणे, वरच्या ओटीपोटाच्या उजव्या बाजूस वेदना किंवा पाठ किंवा खांदेदुखी, मळमळ, भूक न लागणे, वजन कमी होणे, अशक्तपणा, ताप आणि कावीळ यांचा समावेश असू शकतो.
४. ज्या रुग्णामध्ये यकृताच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो, डॉक्टर अशा रुग्णांना यकृत कर्करोगाच्या चाचण्यांची शिफारस करतात. यकृत कर्करोग ओळखण्यासाठी शारीरिक तपासणी, इमेजिंग, रक्त चाचणी किंवा बायोप्सी या सर्व गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो.
५. यकृताच्या कर्करोगाचा उपचार काय आहे?
हे व्यक्तीचे वय आणि एकूण आरोग्य, तसेच यकृताची स्थिती, आकार, स्थान आणि ट्यूमरची संख्या आणि कर्करोगाचे यकृताबाहेर स्थलांतर झाले आहे यावर अवलंबून असते. यकृत प्रत्यारोपण, यकृतातून ट्यूमर काढणे, क्रायोसर्जरी (कर्करोगाच्या पेशी गोठवणे आणि नष्ट करणे), रेडिओफ्रीक्वेंसी अब्लेशन (उष्णतेने कर्करोगाच्या पेशी नष्ट करणे), केमोथेरपी किंवा रेडिएशन किंवा सोराफेनिब (नेक्सावर), यकृताच्या प्राथमिक कर्करोगाच्या अडवान्सड केसमध्ये तोंडी औषधोपचार, हे उपचारांसाठी सर्व पर्याय आहेत.
६. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला यकृताच्या कर्करोगाचा धोका असू शकतो, तर नियमितपणे यकृताच्या तज्ञांना अवश्य भेटा. इतर प्रकारचे यकृत रोग होऊ नयेत म्हणून खबरदारी घ्या. तसेच, लठ्ठपणा, मधुमेह आणि मद्यपान टाळण्यासाठी आपण जे काही करू शकता ते आवर्जून करा.
Recent Comments