देव मानुस श्री . विभुते सर आम्ही सौ.वैशाली हीस काविळ चा इलाज करण्यासाठी जळगाव येथे खाजगी दवाखान्यात अँडमिट केले गेले .त्या अगोदर सुध्दा वैद्यकीय इलाज सुरूच होते.परन्तु जळगाव येथील डॉक्टरांनी सौ वैशालीचे लिव्हर ड डॅमेज झाल्याचे सांगितले व आमचे सर्व कुटुंबावर दुःखाचे डोंगरच कोसळले आम्ही सर्वांनी पुणे येथे पुढील इलाज करून घेण्याचे ठरवले व तेथून आम्ही सर्व रिपोर्ट आमचे नातेवाईक श्री बाविस्कर यांना पाठवले.
उपलब्ध असलेले रिपोर्ट घेऊन श्री बाविस्कर हे डॉक्टर सुचित देशमुख, वाकड पुणे यांचे सल्ल्यानुसार डॉ. श्री बिपिन विभुते यांची भेट घेतली व त्यांनी सहानुभूती पूर्वक सौ वैशाली यांचे उपचाराला सुरुवात केली सध्या सुरू असलेल्या covid-19 परिस्थितीचा विचार करून ऍडमिट न करता गरजेपेक्षा जास्त वेळा वारंवार प्रत्यक्षपणे चेक करून आज साधारणता पंचवीस दिवस सर्व रिपोर्ट पूर्णता नॉर्मल झालेले आहेत.
सध्याची परिस्थिती तथा श्री. विभुते सर व यांची सहकारी यांनी वेळोवेळी सहानुभूतीपूर्वक वागणूक दिली.
सध्याची भयावह परिस्थिती व डॉक्टर श्री विभुते यांचे सहानुभूतीपूर्वक केलेल्या उपचारांमुळे आज आम्ही काही प्रमाणात सुटकेचा श्वास सोडला आहे त्यांचे याबद्दल आमचे कुटुंबीयांवर फार उपकार आहेत . धन्यवाद
आपला विश्वासू जितेंद्र बापूराव सोनवणे , धरणगाव व शांताराम बाविस्कर, पुणे वाकड
Recent Comments