नियती ने थट्टा केली आणी आमच्या परिवारावर तीन महिन्यात दुसरा मोठा आघात झाला. बाबांना आधीच कॅन्सर सारखा भयावह आजार झाला व त्याचे उपचार पुण्याला सुरूच होते आणी माझी तब्येत अचानक कुठल्याही प्रकारची लक्षण नसतानाही एकदम गंभीर झाली.
रिपोर्ट्स बघुन वाटलं आता बायकोचे कुंकु आणी मायेची ममता हिरवल्या जाणार. आपली जीवनातील सगळी गणित अर्घ्यावर सोडुन जायची वेळ आली पण एका वेगळ्याच अदृश्य ताकदीने माझा थोरला भाऊ प्रशांत व माझी बायको विशाखा जे दोघे ही दवाखान्याला घाबरतात ते खंबीरपणे माझ्या मागे उभे झाले व परिवारातील बाकी सदस्य मदतीला होतेच. लागलीच रात्रीच्या विमानाने पुणे गाठले.
[ ] पुण्याला प्रशांतच्या परिचित डॉक्टर जयश्री तोडकर (Multi Organ Surgeon ) ह्याच्या साहाय्याने प्रथमोपचार सुरु झाले. नियतीचा खेळ बघा जेथे बाबा ऍडमीट होते त्याच हॉस्पिटलला व त्यांच्या शेजारच्या रूम मध्ये मला ऍडमीट करण्यात आले. मला असे बघुन तर बाबा पुरते खचले. ते डॉक्टरांना म्हणायचे मी गेलो तरी चालेल माझा शरीराचा कुठलाही भाग ह्यला उपयोगी असेल तर तो काढुन घ्या पण ह्यला वाचवा. रोज नवनवीन टेस्ट व रिपोर्ट्स आले की धोका हा वाढतांना दिसायचा रिपोर्ट्स बघून डॉक्टर जयश्री तोडकर बोलल्या की ऑपेरेशन फार क्रिटिकल आहे. (पित्ताशय पूर्णतः खराब झाले आहे व त्याने लिव्हर ला सुद्धा संक्रमित केले आहे ) मी आहेच पण सोबत पुर्ण तज्ञ वैद्यकीय टीम लागणार आहे. त्यांनी सुचवले की हे ऑपेरेशन फक्त इंग्लंड, चेन्नई, मुंबई किंवा पुण्यालाच होऊ शकते. डॉक्टर तोडकर ह्यांनी सगळ्यांना संपर्क सुरु केला पण इतर डॉक्टर्स वेळे अभावी उपलब्ध होऊ शकत नव्हते मग ठरले की पुण्याचे डॉक्टर बिपिन विभुते (लिव्हर व मल्टि ऑर्गन सर्जन ) त्यांचा लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये हातखंडा आहे व त्यांच्या नावे रेकॉर्ड सुद्धा आहे त्यांची मदत घ्यावी पण ते फार व्यस्त होते प्रशांत हा सतत त्यांच्या संपर्कात होते चार – पाच दिवसांनी त्याची अपॉइंटमेंट मिळाली डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट्स बघुन सांगितले आपण प्रयत्न करूया तेव्हाच श्री देवेन्द्रजी फडणवीस ह्याचा सुद्धा फोन आला ते विभुते डॉक्टर सोबत बोलले मग मला पुणे हॉस्पिटल येथुन सह्याद्री हॉस्पिटल ला हलविण्यात आले व पाच दिवसांनी ऑपेरेशन ठरले.
तो दिवस होता 29 ऑगस्ट 2018
रात्री पासुन पुर्व तयारी सुरु झाली.
पहाटेच सगळा परिवार दवाखान्यात हजर होता
सगळ्यात आधी डॉक्टर तोडकर ह्या आल्या त्यांनी मोठया बहिणीप्रमाणे मायेनी डोक्यावर हात फिरवित मला धीर दिला पण चिंता ही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. मग मला ऑपेरेशन थिएटर कडे हलविण्यात आले
तिथे डॉक्टर बिपिन विभुते. मनिष पाठक, अभिजित माने, अनिरुद्ध भोसले, राहुल तांबे, शैलेश साबळे व डॉक्टर मुंढे . ह्यची टीम तयार होती ह्या सगळ्यांचा परिचय आधीच झालेला होता. सगळ्यांनी मला धीर देत माझा मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. सगळे सोपस्कार आटोपून ती वेळ आली मला आत नेण्यात आले व पुढे मला जाग आली ती पाठक सरांच्या बोलण्याने “अरे वा झान झोपला 14 तास ऑपेरेशन छान झाले आहे”
पुढील पंधरा दिवस मी दवाखान्यातच होतो सगळ्या डॉक्टर व नर्सिंग स्टाफ ने माझी आप्त भावाने सेवा केली. आमचे गुरु बाबाजींनी तर अखंड जाप करत देवाला माझ्या जीवनासाठी साकडे घातले. पुण्यातील आमचे परिचित श्री दिलिप मुरकुटे, श्री अनिल जगताप व माझा मामेभाऊ चेतन आणी माझे मामा रमेश चव्हाण व दिलीप दाजी यांची फार मदत झाली.
परिवार, गुरु, मित्र व आप्तांचे आशीर्वाद आणी डॉक्टर्स च्या कौशल्या मुळे मला दुसरा जन्म मिळाला.
[ ] आज मला दोन वर्ष होत आहे तुरळ्क त्रास सोडता मी आज ठणठणीत आहे. परिवाराच्या मदतीने विस्कळीत झालेले जीवन परत सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश ज्या सगळ्यांनी मला माझ्या वाईट प्रसंगी मदत केली त्यांच्या प्रती आभार प्रकट करणे आहे.
मी आजन्म आपल्या सगळ्यांचा ऋणी राहील
Recent Comments