नाव – श्री प्रभाकर नानाभाऊ शिंदे
मी गेली इ.सन २०१४ पासून लिव्हरच्या आजारामुळे परेशान होतो.
मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ स्वारगेट पुणे येथे वाहक ( कंडक्टर ) या पदावर कार्यरत आहे. मला इ.सन २०१४ ला आपल्याकडे ” चिकनगुनिया “, ” कावीळ “, टायफड अशी संसर्गजन्य आजारांची साथ होती व त्या वेळेस मला पण ताप येणे, पिवळी लघवी होणे अशी सुरुवात झाली. मला वाटले कावीळ झालं म्हणून मी मेडिकल मधून अँटिबायोटिक Vicks 500 Tab व इतर गोळ्या खात होतो व माझी ड्युटी करत होतो. एक महिना ते दोन महिन्यापर्यंत मेडिकलमध्ये गोळ्या घेणे व खाजगी औषध घेणे. तरीपण ताप काही कमी होत नव्हता मी वाहक असल्यामुळे एसटी प्रवासात माझ्या जवळ कोणी प्रवासी बसत नसे. एवढ्या प्रमाणात ताप येत असे.
मी नंतर डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी गायकवाड डायबिटीस सेंटर भोसरी यांच्याकडे गेलो. त्यांनी पण सुरुवातीला एक हप्त्याचा औषधउपचार केला पण ताप काही कमी झाला नाही. नंतर त्यांनी आठ दिवसासाठी ऍडमिट केले. त्यांनी लॅबचे सर्व रिपोर्ट चेक केले तरी पण ताप काही कमी होत नव्हता. मग त्यांनी इंडॉस्कॉपी करण्याचा सल्ला दिला.
इंडॉस्कॉपी केल्यानंतर असे निदर्शनास आले की लिव्हरला सूज व लिव्हरच्या नसा फारच वीक झालेल्या आहेत व त्या डॉक्टरांनी एक महिन्याच्या आत ऑपरेशन करणे ( नसांना बाँडिंग ) यांचा सल्ला दिला. पण आमच्या कडून थोडा उशीर झाला त्यामुळे एके दिवशी अचानक पोटात ब्लडिंग झाले व उलटी व संडास ब्लडची झाली त्यामुळे आम्ही घाबरलो व त्या दिवशी लिव्हरचे डॉ. शोधून आम्ही इनामदार हॉस्पिटल येथे डॉ. संजय साळुंखे सर यांच्याकडे ऑपरेशन केले इ.सन २०१४ पासून ते मे २०२० पर्यंत यांच्याकडेच वेळोवेळी उपचार घेत होतो. पण त्यांनी उपचार केले पण लिवर बदलले किंवा नाही याबद्दल काही शेवटपर्यंत सल्ला किंवा मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे पुढे चालून डिसेंबर २०१९ ते मे २०२० पर्यंत सतत पोटात पाणी साठणे व पायावर सूज येणे, किडनी वर सूज येणे व क्रियाटिन वाढणे तसेच अमोनिया व पोटॅशियम इत्यादी बाबी वाढणे किंवा कमी होणे. त्यामुळे चार ते आठ दिवसांपर्यंत किंवा कोमात जाते, बेशुद्ध होणे असा खूपच त्रास होत असे. या त्रासाला वैतागून आम्ही परेशान होतो शेवटी मे २०२० ला माझ्या पत्नीने व मी सह्याद्री हॉस्पिटल ला भेट देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे माझी पत्नी सौ. लता शिंदे व मी प्रभाकर शिंदे मिळून डॉ. श्री बिपीन विभूते सरांची भेट घेण्याचे ठरविले.
श्री. डॉ. बिपीन विभूते सरांचा मोबाईल नंबर मिळवून आम्ही अपॉइंटमेंट घेतली व त्यांच्या अगोदर एके दिवशी साम टीव्ही चॅनलवर मुलाखत ऐकलेली होती त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरविले.
श्री डॉ. बिपीन विभूते सरांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट या बद्दल पूर्ण माहिती दिली व लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हा शेवटचा मार्ग आहे व त्यामुळे संपूर्ण ऑपरेशनच्या अगोदर पासून ते ऑपरेशन पूर्ण झाल्यापर्यंत संपूर्ण माहिती व गॅरंटी दिली. त्यामुळे लिव्हर डोनेट करण्यापासून मार्गदर्शन केले व सुरक्षितेसंबंधी पूर्ण माहिती दिली.
डॉ. बिपीन विभूते सरांची भेट घेतल्यानंतर त्यांनी जवळचा नातेवाईक डोनर असेल तर १५ दिवसात ऑपरेशन करू असा सल्ला दिला. व लिव्हर डोनेट करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची काळजी किंवा त्रास होणार नाही याची खात्री व गारंटी दिली. त्यामुळे माझी पत्नी सौ. लता शिंदे यांनी त्याच वेळी लिव्हर डोनेट देण्याची तयारी दाखवली व सरांनी लगेच तपासणी चालू करून दिनांक २९/०६/२०२० रोजी माझे लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन चांगल्या प्रकारे केले. आता मला माझे ऑपरेशन व माझ्या पत्नीचे ( डोनर ) ऑपरेशन आम्ही दोघेपण चांगले आहोत.
डॉ. बिपीन विभूते सरांची टीम ( संपूर्ण डॉ. ची टीम ) खूपच चांगली आहे. वेळोवेळी मार्गदर्शन व उपचार पद्धती महाराष्ट्रात नंबर एक आहे असे मला वाटते. डॉ. बिपीन विभूते सरांनी मला नवीन जीवनदान दिले त्याबद्दल मी सर्व डॉक्टरांचा व नर्सेसचा व सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन पुणे यांचा अत्यंत आभारी आहे.
श्री प्रभाकर शिंदे
स्वारगेट पुणे
Recent Comments