मी श्री. विनोद धर्मा चव्हाण माझा मुलगा वय ७ वर्षाचा चि. युवराज विनोद चव्हाण गेल्या ५ वर्षापासून लिव्हर या आजाराने ग्रस्त होता. आम्हाला लिव्हर शस्त्रक्रिया करावयाची होती. आमची उपचार प्रक्रिया नागपूर, नांदेड, हैद्राबाद या ठिकाणी करण्यात आली होती. पण आमची आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्यामुळे आम्हाला ही शस्त्रक्रिया करणे अवघड होत चालले होते. पण चौकशी केल्यानंतर जुपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे काही टेस्ट करण्यात आल्या. पण इथे आम्हाला आमच्या बिकट परिस्थिती पेक्षा जास्त खर्च आला. आम्ही शेवट पर्यंत येथे खर्च करू शकणार नव्हतो. त्यामुळे आम्ही ( सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन पुणे ) इथे पुढील उपचार करण्यास तयार झालो. येथील रुग्णालयात सेवादेणारे डॉक्टर, नर्स, सेवक तसेच हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफचा प्रतिसाद चांगला मिळाला. विशेष करून माननीय डॉ. बिपिन विभुते सर, डॉ. शीतल महाजनी मॅडम, डॉ. स्नेहवर्धन पांडे, डॉ. संतोष थोरात, डॉ. माने सर, डॉ. मनीष पाठक सर व लिवर ट्रान्सप्लांट टीम यांनी वेगवेगळ्या संस्थेकडून आम्हाला मदत मिळावी म्हणून सहकार्य केले. तसेच मा. चेतन सर, राहुल सर, विजय चव्हाण सर यांनी आम्हाला वेळोवेळी माहिती दिली. खरंच या सगळ्यांचा मी ऋणी आहे
माझ्या मुलाची तब्येत लिव्हर शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर ( म्हणजे ५ वर्षा ) पुर्वीची तब्येत खूपच नाजूक परिस्थिती होती नंतर लिव्हर शस्त्रक्रिया केल्यानंतर आता त्याची तब्येत समाधानकारक वाटत आहे व कावीळ हा आजार पूर्णपणे नष्ट झाला आहे. व पोटाची वाढ कमी झाली आहे. तब्येती मध्ये सुधारणा दिसून येत आहे.
विनोद धर्मा चव्हाण ( वडील )
मु. फुलसिंगनगर पो. कासोडा
ता. महागाव जी. यवतमाळ
Recent Comments