सर्वप्रथम सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन पुणे येथील सर्व लिव्हर टीमचे मनस्वी आभार व शतश: ऋणी.
मी गौतम देवरावजी आहाटे ( शिक्षक ) रेणुका नगर यवतमाळ या ठिकाणी दोन शब्दांचा प्रपंच मांडू इच्छितो.
सर माझा पुनर्जन्मावर तर विश्वास नाही, परंतु मी आज मात्र निश्चित सांगू सांगू शकतो कि आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमाने अचूक निदानाने व कौशल्याने मी जिवंत आहे. कदाचित यालाच पुनर्जन्म म्हणत असेल.
सर वैद्यकीय निदानानंतर माझे जेमतेम आयुष्य तीन महिने उरले असतानी माझ्यावर ‘ यकृत प्रत्यारोपणाची ‘ शस्त्रक्रिया करून मला जीवनदान दिले त्याबद्दल मी व माझे कुटुंब आपल्या सर्वांचे ऋणी आहोत. आज आदरणीय डॉ. विभूते व सर्व लिव्हर टीमच्या अथक प्रयत्नांमुळेच मी जिवंत ठणठणीत आहे.
सुरुवातीला २०१७ मध्ये मला कावीळ झाला तो बरा झाला मात्र २०१९ ला तो अनेक डॉक्टरांच्या औषधांनी सुद्धा बरा ( दुरुस्त ) होत नव्हता सात ते आठ महिने मी कावीळ सोबत जगत होतो यवतमाळचे सर्व डॉक्टर मी फिरले.
शेवटी डॉ. भांडारकर ( D.N.B ) यांच्याकडे उपचार सुरू केले तेथे सुद्धा आराम पडला नाही तेथून लिव्हरचे मोठे हॉस्पिटल एशिअन इन्स्टिट्यूट हैदराबाद येथे उपचार सुरू केले. दोन महिन्यानंतर सुद्धा आराम पडत नव्हता.
काही वैद्यकीय चाचण्या नंतर ‘ लिव्हर सिरॉसिस ‘ या आजाराचे निदान केले व लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय असल्याचे सांगितले व खर्च 30 ते 35 लाख रुपये सांगितला हे सर्व ऐकून उपचार थांबवून आम्ही घरी आलो.
आता काही खरं नाही मरण जवळ आहे जेमतेम तीन महिने एक एक दिवस दुःखात जात होता अशातच डॉ. विभूते सरांचा व्हिडिओ पाहण्यात आला ‘ लिव्हर ट्रान्सप्लांट एक यशस्वी शस्त्रक्रिया ‘ खर्च मात्र १७ लाख हे पाहून एक आशेचा किरण मिळाला, जगण्याची नवीन उमेद मिळाली.
प्रत्यक्ष उपचाराकरिता पुण्याचा प्रवास अनेक संकटं आडवी आली तपासण्या झाल्या मात्र डॉक्टरांचा आत्मविश्वास, आधार, प्रेम, सहानुभूती सर्व टीमचे सहकार्यामुळे दिनांक १० जानेवारी २०२० ला माझी ‘ यकृत प्रत्यारोपणाची ‘ यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली व आज मी ठणठणीत बरा आहे.
हे सर्व शब्दात मांडणे कठीण आहे. तिथला एक एक दिवस, एक एक क्षण, आठवला की डोळ्यात पाणी येते. अशा परिस्थितीत कोणतेही नातेवाईक आमच्या पाठीशी नसताना कुटुंबाप्रमाणे आम्हाला मानसिक आधार दिला प्रेम व सहानुभूती दिली व आजारातून पूर्णपणे बरे केले त्याबद्दल मी पुन्हा सर्व टीमचे आभार व्यक्त करतो.
सर आपल्या कर्तृत्वाला यशाची जोड लाभून असे सत्कर्म आपल्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
गौतम देवरावजी आहाटे ( यवतमाळ )
Recent Comments