जानेवारी २०१९ ला श्री विजय शेलार यांना सर्वप्रथम कावीळ चा त्रास झाला तेव्हा मी त्यांना नाशिकच्या सुरभी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले सर्व तपासणी झाल्यानंतर डॉ. बंडोपाध्याय यांनी मला सांगितले की यांचे लिव्हर खराब झाले आहे आणि त्यासाठी डॉ. देशमुख यांना बोलावले त्यांनी पण रिपोर्ट बघून सांगितले की लिवर खराब झाले आहे आणि त्यासाठी एकच पर्याय आहे ‘ लिव्हर ट्रान्सप्लांट ‘ मी हे शब्द ऐकल्यानंतर नंतर खुपच घाबरुन गेली होती. मला असे वाटत होते की आता आपल्या आयुष्यात सर्व संपल. असा अर्धवट संसार त्यात मुले लहान कोणाचा पाठिंबा नाही, आई वडील सोडून कोणाचा आधार नाही. त्या दिवसापासून आयुष्य पूर्णपणे बदलून गेले सारखा मानसिक त्रास.
बंडोपाध्याय सरांच्या औषध डोळ्यांनी यांना बरे वाटले नंतर आम्ही जसलोक हॉस्पिटल च्या आभा नागराळ मॅडम यांची ट्रीटमेंट चालू केली तेव्हा पासून यांना मार्च २०२० पर्यंत कोणताही त्रास झाला नाही दररोज औषध गोळ्या घेऊन रोजची दिनक्रिया व्यवस्थित चालू होती, परंतु २१ एप्रिल २०२० ला त्यांना हर्निया ची छोटीशी गाठ आली आम्ही शरद देशमुख सरांना दाखवले सर बोलले लहान आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु ७ मे २०२० पर्यंत यांचा हर्निया खूप मोठा मोठा झाला त्यात त्यांना उलटी, जुलाब, ताप, प्लेटलेट कमी झाली असे अनेक त्रास झाले परत आम्ही शरद देशमुख सरांकडे गेलो सर बोलले आता आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट करावा लागेल त्यात कोरोना मुळे लॉकडाऊन सर्व दुरून परेशानी चालू झाली तरीही आम्ही ठरवले आता काही झाले तर आपण प्रयत्न करून लिव्हर ट्रान्सफर साठी पण त्याचा खर्च खूप जास्त होतो आम्ही सर्व साधारण परिस्थिती ऐपत नाही एवढे खर्च पेलनेची पण दुसरा कोणताही पर्याय दिसत नव्हता त्यानंतर देशमुख सरांनी म्हणले आम्हाला ट्रान्सप्लान्ट करायचे आहे पण खर्च खूप जास्त आहे काय करावे. सर बोलले तुम्ही प्रयत्न करा आपण खर्च विषयी काही तरी करू मग त्यांनी आम्हाला पुण्याला सह्याद्री हॉस्पिटल मध्ये गेलो आणि डॉ. विभूते सरांना भेटलो सरांशी बोलल्यानंतर जे काही मनात भीती, शंका होती ती सर्व निघून गेली सरांसोबत बोलल्यानंतर माझ्यात खूप सकारात्मता आली, सरांच्या चेहऱ्याचे तेज बघून मला साक्षात देवांना भेटल्यासारखे वाटले, पुणे वरून निघालो तेव्हा येता येता रस्त्यातच विचार केला आता काही भीती नाही सर सर्व ठीक करून देतील नंतर आम्ही सरांनी सांगितले त्या सर्व तपासण्या केल्या आणि ३१ ऑगस्ट २०२० रोजी ऑपरेशन केले. ऑपरेशन एकदम व्यवस्थित झाले ६ दिवसातच डिस्चार्ज मिळाला व शेलार व्यवस्थित चालायला, फिरायला लागले आज जवळपास दीड महिना झाला आहे माझे मिस्टर एकदम व्यवस्थित आहेत.
आणि हे सर्व फक्त आणि फक्त डॉ. बिपीन विभूते सर त्यांची टीम आणि डॉ. शरद देशमुख यांच्यामुळे शक्य झाले, मी पुनश्च्य एकदा विभूते सरांचे मनापासून आभार मानते त्यांनी मला खूप समजून घेतले माझ्या मागे कोणाचा आधार नव्हता सरांनी मला वहिनी बहिणीसारखे आधार दिला समजून घेतले सर्वांना खूप खूप धन्यवाद.
भगवंता ने सरांना खूप आयुष्य द्यावे आणि त्यांच्या हातून ही सेवा कडून घ्यावी हीच भगवंताकडे प्रार्थना.
सौ एन व्ही शेलार ( नाशिक )
Recent Comments