हितगुज
मी अन माझे लिव्हर,
एकदा हितगुज करत होतो
निरोगी आयुष्याचे,
स्वप्न मनी गुंफत होतो
मी अन माझे लिव्हर,
एकदा हितगुज करत होतो
साथ देणार आयुष्यभर
आणाभाका खात होतो,
मी अन माझे लिव्हर,
अशात लिव्हरच्या कुशीत
वेदनांचा वादळ येतं
आरोग्याचा सुंदर बंगला
पत्यासारखा उडवत नेत
मी अन माझे लिव्हर,
भंगलेल्या त्या बंगल्याची
विट ना विट मोजत होतो
अशक्तपणाच्या झुल्यावर
फासागत लटकत होतो
मी अन माझे लिव्हर,
मावळतीच्या जगण्याचे
मिष्कील हसणे बघत
भविष्याच्या अंधारात
काजवा घेऊन फिरत होतो
मी अन माझे लिव्हर,
अशात बिपीन नावाचा आधारस्तंभ
नजरेच्या टप्प्यात सहज येतो
डोळ्यातल्या अश्रूंना चालते व्हा चा
आदेश देतो
मी अन माझे लिव्हर —– बिपिनरूपी तेजोरूप,
जीर्ण झालेल्या लिव्हरला
पुनर्जन्माचे वचन देऊन
कटलेल्या पतंगाची
अलगद दोर बांधून देतो
मी अन माझे लिव्हर,
पुनर्जीवित देहाने
बिपिन रुपी विभूतीचे साष्टांग
दंडवत करत होतो
मानवरूपी देहात प्रत्यक्ष विठ्ठल
पहात होतो
मी अन माझे लिव्हर,
एकदा हितगुज करत होतो
लिवर मध्येच देऊळ करून
बिपिन सरांना कोंडून घेतो.
आपला कृतज्ञ
संजय गायकवाड ( नगर )
Recent Comments